ठाणे पोलिस आयुक्तलयात सोशल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा

एकीकडे कोरोनाने जगभर थैमान घातले असताना ठाणे पोलिस आयुक्तलयात सोशल डिस्टंन्सिंग ह्या शब्दाचा अर्थच माहित नसल्याचे समोर येत आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील चौथ्या मजल्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचा-यांना बसायला अपुरी जागा असून त्यांना दाटीवाटीने बसावे लागत आहे. तसेच येथील एक महिला पोलीस कर्मचारी मुंबईतील हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीमधून वरिष्ठांनी आदेश दिल्याने कामावर हजर झाली आहे. आयुक्तलयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जातं. असं असतानाही आयुक्तलयातील कर्माचारी केवळ वरिष्ठ अधिकारी शिस्तभंग कारवाई किंवा कारणे दाखवा नोटिस देतील या कारणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढयात पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून मोलाची भूमिका बजावत असताना त्यांनी त्यांच्या सोशल डिस्टनसिंगकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading