ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित घरे आणि दुकाने निष्कासित

ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्पातील बाधित बांधकामे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर ठाणे स्टेशन जवळील ६ घरे, ५ दुकाने तसंच मंगला हायस्कूल जवळील घरे रिक्त करून त्यावर निष्कासानाची कारवाई करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी परिसरात सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्प कामामध्ये काही निवासी घरे आणि दुकाने यामुळे कामास विलंब होत आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या नागरिकांचे तातडीने पुनवर्सन करुन हे काम अधिक गतीने करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सर्व बाधित बांधकामे निष्कासित करून नागरिकांचे पुनवर्सन करण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज दिवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मोहसीन खान,फडके पाडा तलावा मागे, खार्डी तळ मजल्याचे अंदाजे २८०० चौ फूट बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने आणि कामगारांच्या मदतीने निष्कासित करण्यात आले. तसेच आतिफ खान यांचे शिबली नगर, शीळ येथील तळ व्याप्त पहिल्या मजल्यावरील अंदाजे ३० × १५ चौ.फूट बांधकाम गॅस कटरच्या मदतीने निष्कासित करण्यात आले. तसेच कळवा प्रभाग समिती अंतर्गत विटावा येथील खार जमीनीवरील अनधिकृत चाळीचे बांधकाम तोडण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading