ठाणे पूर्व येथील सॅटिस प्रकल्पाचे काम 15 महिन्यांत पूर्ण होणार – पालकमंत्री

ठाणे पूर्व येथे होत असलेल्या सॅटिस पुलामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असून यामुळे नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. तसेच या पुलामुळे वाहतूकही विभागली जाणार असल्यामुळे वाहतूकदारांनाही याचा फायदा होणार आहे. या सॅटिस प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या 15 महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सॅटिस प्रकल्पातंर्गत उभारण्यात येणाऱ्या डेकचे भूमिपूजन आज शिंदे यांच्या हस्ते झाले. ठाणे रेल्वेस्थानक पूर्वेकडील बाजूस 2.40 कि.मी लांबीच्या मार्गिकेचे बांधकाम तसेच 8000 स्क्वे.मी. क्षेत्राच्या उन्नत बस डेकचे बांधकाम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानक पूर्व येथे 1 बेसमेंट लेव्हल, तळमजला, मिड डेक लेव्हल आणि डेक लेव्हलचे बांधकाम करणार आहे. बेसमेंट लेव्हलला रेल्वे स्थानकालगत वाहनतळ सुविधा असणार असून या बेसमेंटमध्ये 200 चारचाकी वाहने आणि 125 दुचाकी वाहनांच्या पार्किंग क्षमतेची सुविधा असणार आहे. तळमजला येथे रेल्वे तिकिट बुकिंग कार्यालय, प्रवेशद्वार आत बाहेर, पादचारी प्रवाशांकरिता प्रवासी थांबे मार्गिका आणि प्रतीक्षा क्षेत्राचा समावेश आहे. मिडडेक फ्लोवर लेव्हल येथे प्रवाशांकरिता प्रतिक्षालय,आरामकक्ष या सुविधांचा समावेश आहे. तर डेक लेव्हल या स्तरावर सार्वजनिक बस टर्मिनलचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये 12 बस थांबे असणार आहेत. तयेच या मजल्यावर प्रवाशांकरिता तिकीट बुकिंग कार्यालय आणि प्रतिक्षाक्षेत्र याचा समावेश करण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातून वरच्या डेकवर जाण्यासाठी उद्ववाहनाची सोय देखील असणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading