ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगार झाले नोकरीत कायम

ठाणे परिवहन सेवेतील ६१३ कामगारांना नोकरीमध्ये कायम करण्यात आल्यामुळे या कर्मचा-यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या ६१३ कर्मचा-यांना परिवहन सेवेत कायम करण्यात आल्याचं पत्र देण्यात आलं. यामुळं कामगारांनी एकच जल्लोष केला. परिवहन सेवेच्या भरतीमध्ये हे कर्मचारी अतिरिक्त ठरले होते. या कर्मचा-यांना कायम करावं यासाठी गेली २५ वर्ष लढा सुरू होता. या कर्मचा-यांना कायम करण्यात आल्यामुळे या कर्मचा-यांना निवृत्ती वेतन तसंच इतर भत्तेही मिळणार आहेत. या कर्मचा-यांना कायम करण्यात आल्यामुळं त्यांच्या वेतनात ७ ते ८ हजारांनी वाढ होणार असून त्यांना वेतनातील फरकही मिळणार असल्याचं परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading