ठाणे परिवहन सेवेच्या १० बसेसचं रूग्णवाहिकेत रूपांतर

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड 19 रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी चक्क ठाणे परिवहन सेवेच्या बसेस ॲम्ब्युलन्समध्ये रूपांतरित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळ पर्यंत पाच बस रूग्णवाहिका म्हणून कोरोना विरूद्धच्या लढाईत सहभागी होणार आहेत. या सर्व बसेसमध्ये तीन पाळ्यांमध्ये ब्रदर्स आणि अटेडंटची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाविरूद्धचा लढा अधिक तीव्र करताना त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा भासू नये या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून ठाणे परिवहनच्या दहा बसेस आता ॲम्ब्युलन्स म्हणून वापरण्यात येणार आहेत. एका बसमध्ये दोन बेडस् बसविण्यात आले असून ड्रायव्हरच्या केबिनपासून ॲम्ब्युलन्सचा भाग पार्टीशनच्या साहाय्याने पूर्णतः स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. या बस ॲम्ब्युलन्स तीन पाळ्यांमध्ये चालविण्यात येणार असून या प्रत्येक बसेमध्ये प्रत्येक पाळीमध्ये एक ब्रदर आणि एक अटेडंट नियुक्त करण्यात आले आहेत. यातील पहिल्या पाच बस ॲम्ब्युलन्स आज सायंकाळपासून सेवेत रूजू झाल्या असून उर्वरित 5 बसेस उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने चालणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे याचे नियंत्रण ठेवण्यात आले असून या सेवेसाठी 2539 9828 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading