ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल

ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बस दाखल झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या इलेक्ट्रीक बसचं लोकार्पण झालं. इलेक्ट्रीक बसमुळे शहरातील प्रदुषणात घट होणार आहे. सध्याच्या वातावरणातील बदलांच्या दिवसात अशा इलेक्ट्रीक बसेसचा फायदा होणार आहे. डिझेलवर चालणा-या बसेस प्रदूषणही करतात तसंच त्या चालवायला खर्चही येतो. त्या तुलनेत सर्व दृष्टीकोनातून इलेक्ट्रीकवर चालणा-या बसेसचा परिवहनला फायदा होणार आहे. इलेक्ट्रीकवर चालणा-या बसेस या पूर्णत: वातानुकुलित असल्यामुळे प्रवाशांचा प्रवासही सुखकर होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading