ठाणे परिवहन सेवेचे बोरिवली, नालासोपारा आणि रामनगर मार्गे वागळे आगार हे बस मार्ग ठाणे पश्चिमेकडील सॅटीसवरून चालविण्यात येणार

ठाणे पूर्व येथील उड्डाणपूलाच्या कामामुळे, ठाणे पूर्व येथून चालविण्यात येणारे ठाणे परिवहन सेवेचे मार्ग क्र. ६५ (बोरिवली), मार्ग क्र. ६९ (नालासोपारा) आणि मार्ग क्र. १११ (रामनगर मार्गे वागळे आगार) हे बस मार्ग गुरुवार, आजपासून ठाणे पश्चिमेकडील सॅटीस येथून चालविण्यात येत आहेत. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे रेल्वे स्टेशन, कोपरी पूर्व येथील उड्डाणपूलाच्या सिद्धार्थनगर ते विराज टॉवर दरम्यान पिलरवर सेगमेंट ठेवण्याचे काम २६ जुलै ते २४ ऑगस्ट या काळात केले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी २६ जुलैच्या मध्यरात्रीपासून हा रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. परिवहन सेवेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे पूर्व येथून चालविण्यात येणारे मार्ग क्र. ६५ (बोरिवली), मार्ग क्र. ६९ (नालासोपारा) आणि मार्ग क्र. १११ (रामनगर मार्गे वागळे आगार) हे बस मार्ग उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईपर्यंत ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक सॅटीस येथून चालविण्यात येतील, असे परिवहन सेवा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन परिवहन सेवेस सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading