ठाणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाणपूलावरून कंटेनर खाडीत पडण्याची विचित्र घटना

ठाणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील एका उड्डाणपूलावरून कंटेनर खाडीत पडण्याची विचित्र घटना घडली आहे. भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील पूलावरून कठडा तोडून हा कंटेनर थेट ६० फूट खोल खाडीत पडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवानं या कंटेनरचा चालक रमेश पांडे या दुर्घटनेतून बचावला. त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कळवा, खारेगाव दरम्यानच्या रेतीबंदर खाडी पूलावरून कोसळलेला हा कंटेनर पाण्यातून वाहत कशेळी पूलापर्यंत पोहचला. एवढा या पाण्याचा वेग होता. ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलानं तसंच आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन हा कंटेनर पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला. ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर खाडीतील कंटेनर बाहेर काढण्यात यश आलं. राजेंद्र घोरपडे यांच्या मालकीचा हा कंटेनर भिवंडीहून न्हावाशेवा बंदराकडे निघाला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading