ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष सत्राचे आयोजन

जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी बुस्टर डोस घेतला. पहिला आणि दुसरा डोस तसंच बुस्टर डोस करीता पात्र असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. यावेळी १५३ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद कर्मचारी तसेच जिल्ह्यातील लसीकरणास पात्र सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading