ठाणे कारागृहातील कैद्यांचं लसीकरण

ठाणे कारागृहात कैद्यांचं लसीकरण करण्यास सुरूवात झाली आहे. कारागृहात ४५ वर्षांवरील २०० कैदी असून रोज २० कैद्यांचं लसीकरण जिल्हा सामान्य रूग्णालयात केलं जात असल्याचं कारागृह प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. कारागृहातील कैद्यांना बंदोबस्तामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात येतं आणि लसीकरण झाल्यानंतर पुन्हा या कैद्यांची रवानगी कारागृहात केली जाते. लसीकरणासाठी आणताना कारागृहातील सहा ते सात अधिकारी आणि कर्मचारीही या कैद्यांच्या बरोबर असतात. येत्या १० दिवसांत या कैद्यांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading