ठाणे आणि परिसराला आज सकाळपासून मुसळधार पावसानं झोडपलं

ठाणे आणि परिसराला आज सकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं. ठाण्यात सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. या पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. दादा पाटील वाडी, बी-केबिन, गोखले रोड, जांभळी नाका, आराधना टॉकीज, कोलबाड, वाघोबा नगर, महापालिका मुख्यालय, आनंद सिनेमा, बारा बंगला, विटावा नाका, पोलीस लाईन कोर्टनाका, सिध्दार्थनगर, हाजुरी आणि खारेगाव नाका येथे पाणी साचले होते. ठाण्यात आज सकाळपासून झालेल्या ५ तासात एकूण १०५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळात ८ मिलीमीटर, साडेनऊ ते साडेदहा या एक तासात ३६ मिलीमीटर, साडेदहा ते साडेअकरा या वेळात ५ मिलीमीटर, साडेअकरा ते साडेबारा या वेळात १३ मिलीमीटर, तर साडेबारा ते दीड या एक तासात ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading