ज्येष्ठ समिक्षक आनंद देशमुख यांना कोकण साहित्य भूषण तर डॉ. महेश केळुस्कर यांना कविता राजधानी पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ समिक्षक आनंद देशमुख यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचा कोकण साहित्य भूषण तर निद्रानाश या कविता संग्रहासाठी डॉ. महेश केळुस्कर यांना कविता राजधानी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १० हजार रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शिल्पा सुर्वे यांनी लिहिलेल्या आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर या चरित्र पुस्तकाला धनंजय किर स्मृती प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. चरित्र, आत्मचरित्राचा श्रीकांत शेट्ये स्मृती द्वितीय पुरस्कार उमाकांत वाघ यांच्या वळख या पुस्तकाला जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार विकास आणि प्रमोद व-हाडकर यांनी संपादित केलेल्या बॅनरबाजीला घोषित झाला आहे. काव्यसंग्रहाचा आरती प्रभु स्मृती प्रथम पुरस्कार अनुजा जोशी यांना तर द्वितीय पुरस्कार प्रशांत डिंगणकर यांना जाहीर झाला आहे. ललित गद्यासाठी प्रथम पुरस्कार विनया जंगले तर द्वितीय पुरस्कार आर. एम. पाटील यांना जाहीर झाला आहे. कथासंग्रहासाठी प्रथम पुरस्कार भा. ल. महाबळ यांना तर द्वितीय पुरस्कार अरविंद हेब्बार यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार १० मार्च रोजी होणा-या एका सोहळ्यात नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading