ज्येष्ठागौरींचं आज घरोघरी पारंपरिक पध्दतीनं आगमन

ज्येष्ठागौरींचं आज घरोघरी पारंपरिक पध्दतीनं आगमन झालं. ज्येष्ठागौरींचं आगमन हे अनुराधा नक्षत्रावर होतं. आज दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर अनुराधा नक्षत्र असल्यामुळं दुपारनंतर  गौरी आणण्याचा मुहुर्त होता. चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरींचं आगमन होतं. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचं पूजन होतं, तर चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठागौरींचं विसर्जन केलं जातं असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळागौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गौरी आगमन म्हणजे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी येण्याचा हक्काचा दिवस. गौरी आगमनाच्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीची ओटी भरून पूजा केली जाते. काही ठिकाणी पूर्णाकृती तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवण्याची पध्दत आहे. ज्येष्ठागौरींचं आगमन, पूजन आणि विसर्जन मुहुर्तावरच केलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading