जोशी- बेडेकर महाविद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. जी. जोशी कला आणि एन. जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयानं ५० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. विद्या प्रसारक मंडळ ही ठाण्यातली एक अत्यंत जुनी शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेतर्फे प्राथमिक शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण दिलं जातं. संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतनही आहे. या निमित्तानं संस्थेतर्फे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाविषयी अनुभव पाठवायचे असतील त्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर आपले अनुभव पाठवावेत तसंच या निमित्तानं होणा-या कार्यक्रम आणि उपक्रमात सहभागी होऊन सुवर्ण महोत्सवी वर्ष यशस्वी करावं असं आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या सुमित्रा नाईक यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading