विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर आर्टस् आणि कॉमर्स महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाली आहे. पुढील १० वर्षासाठी ही स्वायत्तता मिळाली आहे. या महाविद्यालयाला गेले अनेक वर्ष ए ग्रेड अॅक्रेडेशन मिळत असून या महाविद्यालयात ७ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आत्तापर्यंत महाविद्यालयाला अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. १९६९ ला महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून या महाविद्यालयाला अनेक मानांकनं मिळाली आहेत. एखाद्या महाविद्यालयास स्वायत्तता मिळणारं हे ठाण्यातील पहिलंच महाविद्यालय असावं.