जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असणाऱ्या कळव्यातील दुकांनावर कारवाई

जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असणाऱ्या कळव्यातील दुकांनावर महापालिकेनं काल कारवाई केली. कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असतानाही इतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या कळव्यातील दुकानांवर कारवाई करण्यात आली. संचारबंदी सुरू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे. सोशल डिस्टन्सींगचं पालन होत नसल्यामुळे फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असून त्यानुसार खारेगाव येथे वास्तुआनंद सोसायटीतील साईकृपा किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स, पुनम सेल्स ॲण्ड सर्व्हिस, बालाजी सुपर मार्केट, बबलु सायकल आणि टायर शॉप, विटावा सूर्यनगर शंकर मंदिरजवळ येथील जनरल स्टोअर्स ही दुकाने दुपारी १२ वाजता सुरू असल्याचे निदर्शनास आले असून या दुकानांवर कारवाई करुन ती सिल करण्यात आली आहेत. ही कारवाई कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading