जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच – जिल्ह्यात 273 तर पालिका क्षेत्रात 101 रुग्ण

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच असून एकुण 273 कोरोनाबाधीत रूग्ण असून पालिका क्षेत्रात 101 रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात अनेक नवीन रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 273 वर पोहोचली आहे.तर ठाणे शहरातही दिवसभरात 9 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आकडा 101 वर पोहचला आहे. ठाणे शहरात बुधवारी कोरोनाबाधीतांचा आकडा 101 वर पोहोचला असून जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात अनेक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील आकडेवारी 273 वर पोहोचली. तर मृतांचा आकडा 11 झाला आहे. कल्याण डोंबिवलीत दोन नवीन रुग्ण आढळून आल्याने तेथील संख्या 57 वर गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका नव्या रुग्णाची नोंद झाली असून आता 52 रूग्ण झाले आहेत. तर मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण भागात बुधवारी एकही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading