जिल्ह्यात कोरोनाचे ९४ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ९४ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात १ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार २४१ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ५७२ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ३६ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ३६१ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १९ नवे रूग्ण, १ मृत्यू तर २६८ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८३५ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २१ नवे रूग्ण ० मृत्यू तर ३०४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९६४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १२ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ८३ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या २४ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ३ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या २९ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ३ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ५६ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५७ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० नवे रूग्ण, २ मृत्यू तर ३२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७७ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ० नवे रूग्ण ० मृत्यू तर ८४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading