जिल्ह्यात कोरोनाचे ६ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ६ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात १३६ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ३ रूग्ण तर ० मृत्यू, सध्या १३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १२७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ रूग्ण तर ० मृत्यू, सध्या ३ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९५२ रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज २ नवे रूग्ण ० मृत्यू तर ९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ४९ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३९७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या १ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६५५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू, सध्या १० रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ० रूग्ण, ० मृत्यू, सध्या एक रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ५८० जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण, ० मृत्यू तर एकही रूग्ण उपचार घेत नसून आत्तापर्यंत ३८८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये एकही रूग्ण नाही तर ० मृत्यू, सध्या ५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading