जिल्ह्यात कोरोनाचे १३६ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १३६ नवे रूग्ण आढळले असून दिवसभरात १ जणांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ६८२ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ५३६ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ४२ नवे रूग्ण मिळाले तर ० मृत्यू, सध्या ३९९ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार १०२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३३ नवे रूग्ण, १ मृत्यू तर ३६४ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत २ हजार ८२० रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३४ नवे रूग्ण ० मृत्यू तर ४२२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत १ हजार ९५५ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १० नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या १२७ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ३७२ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू, तर सध्या ६० रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६४५ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४२ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ५ नवे रूग्ण, ० मृत्यू, सध्या ४९ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ५५५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ५९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ८ नवे रूग्ण एकही मृत्यू नाही तर १६० रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २३१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading