जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ४ हजार ३५० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत २ लाख ८३ हजार ८४९ रूग्ण कोरोनातून बरे झाले तर ६ हजार ५१० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३३ हजार ३०२ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण ३ लाख २३ हजार ३६१ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १ हजार ४३२ नवे रूग्ण सापडले ५ मृत्यू तर सध्या ९ हजार ९२२ रूग्ण उपचार घेत आहेत. ६८ हजार ११ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज १ हजार २५९ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर ८ हजार ८४५ रूग्ण उपचार घेत आहेत. ६९ हजार ९६७ बरे झाले तर १ हजार २५९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ९७१ नवे रूग्ण ४ मृत्यू तर ६ हजार ७०० रूग्ण उपचार घेत आहेत. ५८ हजार ६०१ रूग्ण बरे झाले तर १ हजार १७९ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ३५३ नवे रूग्ण, २ मृत्यू तर २ हजार ३९९ रूग्ण उपचार घेत आहेत. २७ हजार ७६१ कोरोनातून बरे झाले तर ८२७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २१८ नवे रूग्ण, १ मृत्यू तर १ हजार ५४१ रूग्ण उपचार घेत आहेत. १२ हजार १५४ बरे झाले तर ३७९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ५२ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर ५५० रूग्ण उपचार घेत आहेत. ६ हजार ८२५ कोरोनातून बरे झाले तर ३६३ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १७२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १ हजार ६१० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ९ हजार ९९ बरे झाले तर ३१९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १७७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ७१३ रूग्ण उपचार घेत आहेत. ११ हजार ७३१ कोरोनामुक्त झाले तर १२३ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ७७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ७२२ रूग्ण उपचार घेत आहेत. १९ हजार ७६० बरे झाले तर ६०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading