जिल्ह्यात एकूण ८ हजार २६७ कोरोनाग्रस्त रूग्ण

जिल्ह्यात एकूण ८ हजार २६७ कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण ४४ हजार ९०७ सिम्प्टोमॅटीक रूग्ण असून ३४ हजार ८९२ रूग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. एकूण २५६ जणांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ६०० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत १ हजार ३४३ रूग्ण बरे झाले असून ८९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या ६५० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून आत्तापर्यंत ३५५ रूग्ण बरे झाले तर २९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या ७८५ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून आत्तापर्यंत १ हजार ३४६ बरे झाले तर ७३ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात ३०४ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून आत्तापर्यंत ४०५ बरे झाले तर २९ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात सध्या २४६ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत १०३ जण बरे होऊन घरी गेले तर ११ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये सध्या ७२ रूग्ण कोरोनाग्रस्त असून ६८ बरे झाले तर ७ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला. अंबरनाथमध्ये ११६ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत ४७ बरे झाले तर तिघांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ११३ रूग्ण उपचार घेत असून १०५ बरे झाले तर ७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १५१ रूग्ण असून २०२ जण बरे झाले तर ८ जणांचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading