जिल्ह्यात आज ७९ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार सायंकाळी सातपर्यंत ७९ हजार ३३३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी १२ लाख २३ हजार ९३२ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६४ लाख १२ हजार २५ नागरिकांना तर ४८ लाख ११ हजार ९०७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४८७ सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading