जिल्ह्यात आज १३२ नवीन रूग्ण

जिल्ह्यात आज १३२ नवीन रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात ९५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात ५३ नवीन रूग्ण आढळले. सध्या ४५९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये ९ नवीन रूग्ण तर एकाचा मृत्यू झाला. सध्या ४९ रूग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईमध्ये ४८ नवीन रूग्ण तर २६६ रूग्ण उपचाराधीन आहेत. उल्हासनगर मध्ये ९ नवे रूग्ण तर ५१ रूग्ण उपचार घेत आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात एकही रूग्ण नाही तर ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मीरा-भाईंदर मध्ये ७ नवे रूग्ण आढळले तर ६३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये २ रूग्ण तर १४ रूग्ण उपचाराधीन असून ठाणे ग्रामीण मध्ये ४ नवे रूग्ण आढळले आणि ३७ रूग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading