जिल्ह्यात आज कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार ३२ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत २ लाख ५८ हजार १५८ रूग्ण कोरोनातून बरे झाले तर ६ हजार ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७ हजार ७२० रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण २ लाख ७२ हजार १९३ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आज २५६ नवे रूग्ण सापडले २ मृत्यू तर सध्या १ हजार ९६२ रूग्ण उपचार घेत आहेत. ६० हजार ९८५ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ४०५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ३९२ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २ हजार ३६० रूग्ण उपचार घेत आहेत. ६१ हजार ८९६ बरे झाले तर १ हजार २०८ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १५६ नवे रूग्ण १ मृत्यू तर १ हजार ५८१ रूग्ण उपचार घेत आहेत. ५४ हजार ६२ रूग्ण बरे झाले तर १ हजार १३१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ५३ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ७५० रूग्ण उपचार घेत आहेत. २६ हजार ११६ कोरोनातून बरे झाले तर ८०४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३० नवे रूग्ण, ० मृत्यू तर २३१ रूग्ण उपचार घेत आहेत. ११ हजार ४४४ बरे झाले तर ३७३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १० नवे रूग्ण, ० मृत्यू तर ७३ रूग्ण उपचार घेत आहेत. ६ हजार ४३९ कोरोनातून बरे झाले तर ३५६ जणं दगावले. अंबरनाथमध्ये २९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २११ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ८ हजार ४८८ बरे झाले तर ३१६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ५१ नवे रूग्ण, ० मृत्यू तर २३५ रूग्ण उपचार घेत आहेत. ९ हजार ९२८ कोरोनामुक्त झाले तर १२९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ५५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ३१७ रूग्ण उपचार घेत आहेत. १८ हजार ८५८ बरे झाले तर ५९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading