जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२४ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ हजार ३१६ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ६४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख १३ हजार ३७४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २६ हजार २७६ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ७०२ रूग्ण उपचार घेत असून ४७ हजार ७३१ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २२४ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार ५४६ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार ७५१ बरे झाले तर १ हजार ५३ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार ५६४ रूग्ण असून ४५ हजार १६६ बरे झाले तर ९७१ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ५४३ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार ६५२ कोरोनातून बरे झाले तर ७५५ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २४३ रूग्ण असून १० हजार ११५ बरे झाले तर ३५३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ९९ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ७८५ कोरोनातून बरे झाले तर ३४५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १८५ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार ३४० बरे झाले तर २८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २२३ रूग्ण असून ७ हजार ६१० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार २११ रूग्ण असून १६ हजार २२३ बरे झाले तर ५६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading