ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयात १२५ नवीन ऑक्सीजन खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या असून आज त्याचं पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांना खाटांची कमतरता भासू नये म्हणून या १२५ नवीन खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाचा आढावा घेऊन रूग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचा-यांच्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक केलं तसंच त्यांना काळजी घेण्याचं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं.