जिल्हा शासकीय रूग्णालयात उद्या म्हणजे ७ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील ज्या नागरिकांनी नोंदणी केली असून ज्यांना सिव्हील हॉस्पिटल स्लॉट मिळाला आहे त्यांच्यासाठीच उद्या कोव्हॅक्सिन लसीचं लसीकरण होणार आहे. नोंदणी न करता आलेल्या नागरिकांना लस मिळणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी.