जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल फेरीचे आयोजन

विद्या प्रसारक मंडळातर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून घोषित केला आहे. जगभर हा दिवस सायकल संबंधी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. हा दिवस सायकलची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता ओळखण्यासाठी तसंच त्याचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. शहरातील नागरिकांनी जवळचे अंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींचा वापर केला तर दररोज शेकडो लिटर इंधनाचा वापर कमी होईल आणि शहरातील प्रदूषण पातळीही कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे सायकलिंग हे उत्तम आरोग्यासाठी फायद्याचे आहे. या दिवसाचे औचित्य साधून शुक्रवार 3 जून रोजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सायकल फेरी आयोजित केली आहे. ही सायकल फेरी ज्ञानद्वीप संकुलापासून शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरु होईल. ठाण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्न्य आणि आंतरराष्टीय ख्यातीचे मॅरेथॉन पटू डॉ महेश बेडेकर या सायकल फेरीला झेंडा दाखवून शुभेच्छा देतील. शहरातील ठरवलेल्या मार्गाने ही सायकल फेरी पूर्ण करून विद्या प्रसारक मंडळाच्या संकुलात सकाळी 8.30 वाजता या फेरीचा समारोप होईल . जोशी बेडेकर महाविद्यलयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांच्या हस्ते फेरीमध्ये सहभागी कर्मचायांचा सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading