जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2023 च्या निमित्ताने “मानसिक आरोग्य हा सार्वजनिक मानवी हक्क आहे” या घोषवाक्यावर आधारित ठाणे शहरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे आणि शेखर डोंबे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे यांच्या पुढाकारातून प्रादेशिक मनोरुग्णालयच्या उपअधीक्षक (मनोविकार तज्ञ) डॉ. प्राची चिवटे आणि जेष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. आशिष पाठक यांचे “मेंटल हेल्थ आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध मानसिक आजारांविषयी तसेच उपचारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी नारायण रेकी सत्संगच्या सेविका प्रभा गणू यांचेही प्रोत्साहनात्मक भाषण झाले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading