जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित

शिवसेना ठाणे जिल्हा शाखा महिला आघाडी आणि चैत्रगौरी महिला मंडळ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ आणि सूर नवा ध्यास नवा फेम अंशिका चोणकर हिच्या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धेश्वर तलाव, ठाणे येथील मैदानात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन शिवसेना उपनेत्या महिला आघाडी अनिताताई बिर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महिलांना शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी आपल्या भाषणातून महिलांमध्ये एक चैतन्य निर्माण केले. प्राध्यापक मेधा सोमण यांनी जगाव कसं या विषयावर व्याख्यान तसेच फोर्टीस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर हितेश संघवी यांनी समाजामध्ये महिलांमधील कॅन्सरचे वाढणारे प्रमाण लक्षात घेवून कॅन्सर या आजारावर कशा प्रकारे मात करावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच सूर नवा ध्यास नवा फेम अंशिका चोणकर हिचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम संपन्न होत असताना मिस सुंदरी, मिसेस सुंदरी यांच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली. तसेच ११ मार्च रोजी झालेल्या पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची महिला आणि मुली, बुक बॅल्न्सिंग, बकेट बॉल, चमचा गोटी, स्टेशन गेम, बम्बार्डींग, केसात स्ट्रॉ टाकणे. या स्पर्धांमधील विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार तसेच भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading