जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी सायकल राईड

जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सायकल प्रेमी ग्रुपतर्फे रणरागिणी सायकल राईडचं आयोजन करण्यात आलं होतं.
कोणी ३४ वर्षांनी, कोणी २० वर्षांनी तर कोणी १५ वर्षांनी सायकल हातात घेतली होती. उत्साहाने, आनंदाने महिलांनी सहभागी होऊन आपल्या लहानपणी चालवलेल्या सायकलच्या आठवणींना उजाळा दिला. लहान मुलींपासून ५० वर्षावरील महिलांचा यात सहभाग होता. आम्ही सायकल प्रेमी ग्रुपच्या संस्थापिका अध्यक्षा पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून या राईडचे आयोजन करण्यात आले होते. सायकल चालवूया, आरोग्य जपूया हा संदेश या राईडमधून देण्यात आला. यावेळी ५ आणि १० किमी अंतराची राईड आयोजित केली होती. सकाळी ६.५५ वाजता ठाणे महापालिका भवन येथून सायकल राईडला सुरुवात झाली आणि कचराळी तलाव येथे समाप्त झाली. मुंबईच्या पहिल्या तृतियपंथी टॅक्सी चालक करीनाताई आडे आणि एका चाकावर सायकल चालविणारे इम्रान खान यांनी देखील महिलांसोबत सायकल चालवून त्यांना प्रोत्साहन दिले. प्रज्ञा म्हात्रे यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईडला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कचराळी तलाव येथे सर्व महिलांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सिव्हिल रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ प्रिया गुरव यांनी सायकलचे आणि संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले तर स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे यांनी सर्व महिलांचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला मोलाची मदत केल्याबद्दल माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आणि ओझोन बायसिकल कंपनीचे मालक शैलेश घोलप यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक महिलेने सायकल चालवून आरोग्याची काळजी घेण्याचा निश्चय केला.
सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनीही सरस्वती शाळेच्या मैदानात आम्ही सायकल प्रेमी ग्रुपच्या सायकलप्रेमींचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading