जागतिक पातळीवरील ऑनलाईन प्रदर्शनात विद्या प्रसारक मंडळ तंत्रनिकेतनाच्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रीक चार्जिंगसाठी कमी वेळ लागणारा प्रकल्प

विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनाचे विद्यार्थी मोस्ट्रॅटेक या ऑनलाईन प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. विद्या प्रसारक मंडळातर्फे २०१३ पासून या प्रदर्शनात विद्यार्थी सहभागी होत आहेत. आत्तापर्यंत विद्या प्रसारक मंडळाला या प्रदर्शनातील प्रकल्पांबद्दल रौप्य आणि कांस्य पदकही मिळालं आहे. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळं हे प्रदर्शन प्रथमच ऑनलाईन आयोजित करण्यात आलं आहे. सध्या इलेक्ट्रीक वाहनांची मोठी चलती असून या इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनबाबत या विद्यार्थ्यांनी आपला प्रकल्प सादर केला आहे. इलेक्ट्रीकल व्हेईकल चार्जिंगसाठी ४ ते ८ तासांचा वेळ लागतो. हा वेळ कमी करण्यासाठी काय करता येईल हे या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पातून मांडलं आहे. यामागे इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढावा हा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणा-या या प्रदर्शनात १६ ते २१ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होतात. या प्रदर्शनात जगभरातील २५ देश सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading