जागतिक एड्स दिनानिमित्त एका जनजागृती रॅलीचं आयोजन

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्यातर्फे एका जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा सामान्य रूग्णालयातून या रॅलीची सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय जांभळीनाका मार्गे पुन्हा जिल्हा सामान्य रूग्णालय येथे ही रॅली विसर्जित झाली. सतिश प्रधान ज्ञानसाधना विद्यालयानं एड्स या विषयावर पथनाट्य सादर केलं. अपूर्वा महिला सामाजिक संस्था, लायन्स क्लब यांच्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीनंतर एड्स विषयी जनजागृतीचं काम करणा-या संस्था आणि संघटनांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading