जवळपास दीड वर्षांनी आलेला अंगारकी चतुर्थी योग कोरोनामुळे काहीसा झाकोळला गेला. १७ सप्टेंबर २०१९ मध्ये अंगारकी चतुर्थीचा योग आला होता. मात्र त्यानंतर वर्षभर अंगारकी चतुर्थीचा योग नव्हता. आज मोठ्या कालावधीनंतर अंगारकीचा योग आला आहे. मात्र या अंगारकीवर कोरोनाचं सावट आहे. गर्दी होऊ नये म्हणून श्रीगणेशाची अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री गणेश भक्तांना टिटवाळ्याच्या महागणपतीचं दर्शनं मिळावं यासाठी रेल्वेतर्फे खास उपनगरीय गाड्याही सोडल्या जात असत. पण यंदा मात्र कोरोनामुळं असं काही झालं नाही. गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीगणेशाचं लांबूनच दर्शन घेण्यावर समाधान मानावं लागलं. आता २७ जुलै आणि २३ नोव्हेंबरला पुन्हा अंगारकी चतुर्थीचा योग आहे.