जलशक्ती मंत्रालयातर्फे ‘स्वच्छता लघुपट’ स्पर्धेचे आयोजन

ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी केले आहे. ही स्पर्धा दोन भागामध्ये होणार असून दिलेल्या विषयाचा लघुपट निर्मिती करुन स्पर्धकाने लघुपट You-Tube वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने http:www.mygov.in/ या संकेतस्थळावर स्पर्धेच्या अर्जासह २० जुलै पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
भाग १ – स्पर्धेकरीता हागणदारी मुक्तीवर लघुपट निर्मिती करावी
विषय – जैव- विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे विषय आहेत.
प्रथम पारितोषिक 1 लाख 60 हजार, व्दितीय पारितोषिक 60 हजार रुपये तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
भाग- 2 साठी भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मितीचे करावयाची आहे. यामध्ये वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपटटी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्रातील लोक सहभागी होउ शकतात.
विषय – प्रभावी स्वच्छता संदेश किंवा घन कचरा सांडपाणी व्यवस्थापन यावर लघुपट बनवायचे आहेत
प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, व्दितीय पारितोषिक 1 लाख 20 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 80 हजार रुपये असे असणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या पाणी, स्वच्छता विभागातील कर्मचारी, सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळून 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेत संस्थात्मक श्रेणीत, ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट सहभाग घेऊ शकतात. लघुपटांचा कालावधी कमीत कमी 1 मिनिट ते 5 मिनिट असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मिती केलेले लघुपटच या स्पर्धेसाठी स्विकारले जातील. स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सर्व स्पर्धकांनी संकेत स्थळावरील नियम अटींच्या अधीन राहून अर्ज सादर करावेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading