जलवाहिनी फुटल्यामुळे खंडीत झालेल्या भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता

जलवाहिनी फुटल्यामुळे खंडीत झालेल्या भागाचा पाणीपुरवठा उद्या सकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. शीळफाटा परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी काल संध्याकाळी फुटली होती. ही जलवाहिनी दुरूस्त करण्याचं काम आज संध्याकाळी ६ पर्यंत पूर्ण झालं आहे. त्यामुळं आता खंडीत झालेल्या भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपर्यंत सुरळीत सुरू होईल असं औद्योगिक विकास महामंडळातर्फे सांगण्यात आलं. १४७२ मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी फुटल्यानंतर ती दुरूस्त करण्यात आली होती. मात्र दुरूस्त करण्यात आलेली वाहिनी पुन्हा फुटल्यानं काल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पाणी पुरवठा होणा-या भागाचा पाणी पुरवठा खंडीत झाला होता. आता ही जलवाहिनी दुरूस्त झाली असून उद्या सकाळपर्यंत हा पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू होईल असं महामंडळातर्फे सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading