चंद्रयान-३ मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राकेश पिसाट यांचा कंपनीच्या वतीने हृद्य सत्कार

चंद्रयान- ३ च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांबरोबरच एका सर्वसामान्य ठाणेकराचाही सहभाग मोलाचा ठरला आहे. मुंबईतील गोदरेज कंपनीत काम करणारे कामगार राकेश पिसाट यांनी चंद्रयान-३ मध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल कंपनीच्या वतीने नुकताच त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. पिसाट हे ठाण्यातील कोपरी परिसरातील सुनिता सोसायटीत राहतात. चंद्रयान- ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विश्वविजयी अवतरण करून संपूर्ण जगाला थक्क केले. इस्त्रोच्या या यशात ठाण्यातील नागरिकांचाही मोलाचा वाटा आहे. चंद्रयान ३ मधील अतुलनीय कामगिरी बद्दल राकेश पिसाट यांचा एलपीएससी इस्रोचे डायरेक्टर डॉ. नारायण यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. गेली ३३ वर्ष गोदरेज समुहा बरोबर एरोस्पेस क्षेत्रात टेक्निकल फील्ड मध्ये काम करत असताना १९९९ साली त्यांना कौशल्य पुरस्कार म्हणून सुवर्ण पदक देण्यात आले. तसेच २००९ साली Society of Aerospace manufacturing Engineers Udymik Award देवून गौरवण्यात आले. तसेच इतर अनेक पुरस्कार मिळवत त्यांनी चंद्रयान १, चंद्रयान २, मिसाईल्स, क्रायोजेनिक इंजिन, विकास इंजिन तसेच मंगलयान यांच्या निर्मितीमध्ये मोलाची कामगिरी केली आहे. आणि आता चंद्रयान ३ मधील अतुलनीय कामगिरी बद्दल इस्रोचे डायरेक्टर डॉ.नारायणन, तसेच अनेक शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक यांच्या उपस्थितीत गोदरेज आणि बौइस,मुंबई. येथे राकेश पिसाट यांना गौरवण्यात आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading