घरगुती गणपती आणि गौरींपुढील सजावटी पहा ठाणेवार्ता मध्ये

ठाणे वार्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणपती पुढील सजावट दाखवणार आहे. यंदा करोनामुळे आम्हाला प्रत्यक्ष प्रत्येकाच्या घरी येणं शक्य नसलं तरी आपण आपल्या घरगुती गणपती पुढील सजावट आम्हाला पाठवू शकता. मात्र ही सजावट दाखवायची की नाही याचा हक्क आमचा राहील. ज्यांच्या सजावटी घरगुती गणपती पुढील सजावटी उत्तम असतील, पर्यावरणाचा विचार केला असेल त्यांच्या सजावटी ठाणे वार्तातुन दाखवल्या जातील. आपण आपल्या घरगुती गणपती पुढील सजावट आम्हाला 9987942222 या क्रमांकावर व्हाट्सअप करावी. ही सजावट साधारणता एक मिनिटापर्यंत चित्रीत असावी, घरगुती गणपती बरोबरच ज्यांच्या घरात गौरींचे आगमन होणार आहे, त्यांच्या गौरीं पुढील सजावटही आकर्षक असल्यास प्रक्षेपित केली जाईल, मात्र ही सजावटही आपण हॉरीझंटल म्हणजे फोन आडवा ठेवून साधारणता एक मिनिटापर्यंत चित्रित करावी. त्यांचा ठाणे वार्ता मध्ये समावेश केला जाईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading