गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा याच काळात जवळपास दुप्पट पाऊस

पावसाचं आगमन तब्बल दहा-बारा दिवसांनी उशिरा झालं असलं तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा याच काळात जवळपास दुप्पट पाऊस झाला आहे. गेले चार दिवस ठाणे आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून रात्री साडेआठ पर्यंतच्या १२ तासात ठाण्यात ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची यंदा जवळपास जून महिना संपत आल्यानंतर सुरूवात झाली. मात्र केवळ आठ दिवसातच पावसानं सरासरी पूर्ण केल्याचं दिसत आहे. यावर्षी आत्तापर्यंत ६४६ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्यावर्षी आत्तापर्यंत ३२३ मिलीमीटर पाऊस झाला होता.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading