गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ९० टक्के पाऊस

ठाण्यामध्ये गेले काही दिवस पाऊस कोसळत असला तरी गेल्यावर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी अवघा ९० टक्के पाऊस झाला आहे. जूनपासून पावसानं हजेरी लावली आहे. मधले काही दिवस वगळता पाऊस चांगलाच कोसळत आहे. जूनपासून आत्ता सप्टेंबर १२ पर्यंत २ हजार ४२१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात २ हजार ७८२ मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजे तो आधीच्या सरासरीच्या तुलनेत १२४ टक्के होता. त्यामुळे यंदा पाऊस कमी झाला असंच दिसत आहे. पण या कमी झालेल्या पावसानंही सर्वसामान्य ठाणेकरांची अनेकदा त्रेधातिरपिट उडवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading