गीताचे ज्ञान विश्वातील मानवता निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हे सरकार भगवद् गीतेच्या ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल – उपमुख्यमत्री

गीताचे ज्ञान विश्वातील मानवता निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे हे सरकार भगवद् गीतेच्या ज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती आणि शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथील आनंदनगरमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि विराट संत संमेलनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून संत-महात्म्यांचे आशिर्वाद घेतले. जगतगुरू स्वामी वासुदेवनंद सरस्वती महाराज, यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. महामंडलेश्वर नवलकिशोर दास, भागवत कथाकार देवकीनंदन ठाकूर आदी संत मंडळी यावेळी उपस्थित होती. संतांच्या हस्ते उपमुख्यमंत्रीयांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जेव्हा जेव्हा संस्कार समाप्त होतात तेव्हा संस्कृती समाप्त होते आणि जेव्हा संस्कृती संपते तेव्हा सभ्यता लोप पावते. मात्र, संतांनी संस्कार आणि संस्कृतीला लोप पावू दिले नाही. म्हणून आमची सभ्यता जिवंत आहे. विश्वात सर्वात पुरातन ही सनातन संस्कृती, हिंदू धर्म आहे. या संतांकडून आमचे मन शुध्द केले जात आहे. संस्कृति मिटवण्यासाठी मंदिराना पुन्हा जोडण्याचे काम महाराष्ट्राच्या कन्या अहिल्या देवी होळकर यांनी केले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद मोदी हे काम करत आहेत, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading