गायमुख चौपाटी जवळ एक कंटेनर रस्त्यावरून घसरून अपघात

गायमुख चौपाटी जवळ एक कंटेनर रस्त्यावरून घसरून अपघात झाला. हा कंटेनर सुरतहून तळेगावच्या दिशेने चालला होता. मेसर्स आर के बल्क कॅरिअर्सचा हा कंटेनर स्टीलच्या कॉईल्स घेऊन घोडबंदर रस्त्यावरून जात असताना गायमुख चौपाटीजवळ रस्त्यावरून घसरून खाली आला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरला वर काढले आणि वाहतूक सुरळीत सुरू केली. सुदैवानं यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. कासारवडवली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading