गरोदर महिला आणि स्तनदा माता यांचाही करोना लसीकरणात अंतर्भाव करण्याची स्त्रीरोगतज्ञ महेश बेडेकर यांची मागणी

गरोदर महिला आणि स्तनदा माता यांचाही करोना लसीकरणात अंतर्भाव करावा अशी मागणी ठाण्यातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर महेश बेडेकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. सध्याच्या लसीकरणा मध्ये गरोदर महिलांचा समावेश करण्यात आलेला नाही मात्र गरोदर महिला या सध्याच्या काळात अतिशय धोक्याच्या गटात मोडत आहेत. डॉक्टर बेडेकर यांच ठाण्यामध्ये सत्तर वर्ष जून प्रसुतिग्रुह आहे. त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या गरोदर महिला त्यांचे कुटुंबीय याबाबत अनेकदा विचारणा करत असतात. गरोदर महिलांचे कुटुंबीय याबाबत मोठ्या काळजी काही पाहायला मिळतात. खरंतर स्तनदा माता आणि गरोदर मातांवर ही कोणताही तणाव नसावा असं सांगितलं जातं. मात्र सध्याची परिस्थिती ही वेगळीच आहे. डॉक्टरांच्या अनेक जागतिक संघटनांनीही स्तनदा माता आणि गरोदर मातांचा लसीकरणात अंतर्भाव करण्यासाठी सुचवल आहे. अमेरिका, इंग्लंड, आणि युरोपियन देशांमध्ये तर गरोदर माता आणि स्तनदा मातांच आतांच लसीकरणही करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आपल्या देशात अद्यापही या गोष्टीला परवानगी मिळालेली नाही. गरोदर माता आणि स्तनदा माता यांचा अंतर्भाव सुरक्षिततेसाठी करोना रसिकरण कार्यक्रमात करावा अशी मागणी डॉक्टर महेश बेडेकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading