खड्ड्यांमुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर

शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहनं चालवणं जिकीरीचं होत असून यामुळं वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. काल मुंबई-नाशिक महामार्गावर अशीच वाहतूक कोंडी अनुभवायला मिळाली. मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असून नक्की वाहतूक कोंडी कशामुळे होते याचा पोलीसांनी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही ठिकाणी नो-पार्कींग झोन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. खड्ड्यांमुळे धिम्या गतीनं वाहनांची धाव सुरू होती. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनंही अडकली होती. रस्त्यातील खड्डे पोलीसांनी माती-दगड टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचा प्रयत्नही काल केल्याचं दिसलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading