कौसा-मुंब्रामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू

कौसा-मुंब्रामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कौसा, मुंब्रा या ठिकाणी ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारातील मलनिस्सारण टाकी साफ करण्याचे काम अमोल पाटील यांनी घेतले होते. टाकी साफ करण्याकरिता एकूण ६ व्यक्ती उपस्थित होत्या.या 6 जणांपैकी २ व्यक्ती टाकी साफ करण्यासाठी उतरल्या आणि त्या गुदमरून बेशुद्ध पडल्या. बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना त्यांच्यासोबत काम करीत असलेल्या चौघांनी आणि इमारतीतील रहिवाश्यांनी टाकी मधून बाहेर काढले. त्यांना प्राईम क्रिटी केअर रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. हनुमान कोरपक्कवाड आणि सूरज मढवी या दोघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading