कोवीड 19 चाचणीसाठी डॅाक्टरांच्या शिफारशीची आवश्यकता नाही – महापालिका आयुक्तांचे निर्देश

कोवीड 19 चाचणीसाठी आता डॅाक्टरांच्या शिफारशीची गरज नसल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी तसे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. यापूर्वी डॅाक्टरांच्या शिफारशींशिवाय कोवीड 19 ची चाचणी करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. परंतू संशयित रूग्णांची योग्यवेळी चाचणी करून त्यांना वेळीच अलगीकरण केले तर कोवीडचा प्रादूर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जनरल प्रॅक्टीशनर्सनाही कोवीड 19 चाचणीची शिफारस करण्यासाठी प्रतिबंधित कण्यात आले होते. परंतु आता त्यांना संशयित रूग्णांना कोवीड 19 च्या चाचणीसाठी शिफारस करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading