कोवीडच्या साथीमध्ये राज्य शासन, महापालिका आणि आरोग्य यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव – देवेंद्र फडणवीस

कोवीडच्या साथीमध्ये राज्य शासन, महापालिका आणि आरोग्य यंत्रणांचा समन्वय अपेक्षित असून कोवीड चाचण्यांचा  अहवालही 24 तासात मिळण्याची गरज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचा दौरा करून रुग्णांना विषयी माहिती घेतली. तसेच क्वॉरन टाईन सेंटर आणि कोवीड रुग्णालयाला त्यांनी भेट दिली, त्यानंतर पालिका आयुक्तांशी चर्चा केल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही गरज व्यक्त केली. सिम्टोमॅटीक रुग्णावर रुग्णालयांनी वेळीच उपचार केले तर मृत्यूचा दर कमी होईल असे मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण हे मुंबई आणि मुंबई महानगर प्राधिकरणक्षेत्रात असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने उभारलेलं रुग्णालय त्यातिल सुविधा  उत्तम आहेत मात्र  या रुग्णालयात योग्य व्यवस्थापन नसल्याची टिका त्यांनी केली. रुग्णालय उत्तम असल तरी रुग्णालयात डॉक्टर कर्मचारी उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असून जिओ टॅगिंग, रुग्ण ट्रेकिंग, क्लोज सर्किट कॅमेरे अशा यंत्रणांची आवश्यकता आहे. रुग्णालया मध्ये आपल्या रुगणाच काय होतय याचा पत्ताच रुग्णांच्या नातेवाईकांना  नसेल तर उपयोग काय.रुग्णालयात काही रुग्णांचा पत्ताच लागत नसल्याच्या तक्रारी आल्या असल्याच त्यानी यावेळी सांगीतल. आपल्याला क्लोज सर्किट कॅमेरा एक्सेस अगदी घरीसुद्धा देता येऊ शकतो आणि यातून रुग्णांच्या नातेवाईकांची चींता  मिटू शकते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading