कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपालांनी घेतली दखल

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कडक कारवाई करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी आवाज उठविल्यानंतर ठाणे भारतीय जनता पक्षानेही चौकशीची मागणी केली होती. यासंदर्भात किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी गायकवाड, सोनावणे कुटुंबियांनीही आपल्या भावना राज्यपालांकडे व्यक्त केल्या. ठाणे शहराला कोरोनाचा विळखा पडला असताना महापालिकेकडून विशेष सतर्कतेने रुग्णांवर उपचार होण्याची गरज होती. मात्र महापालिकेने कोट्यवधी खर्चून उभारलेल्या विशेष कोरोना रुग्णालयात गैरव्यवस्था असल्याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी असलेल्या औषधांचा मुंबई महापालिकेच्या काही कर्मचार्‍यांकडून काळाबाजार चालू असल्याप्रकरणी कारवाईची मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading