कोविड उपचारांमध्ये उत्तम शुश्रृषा करून सिव्हील रूग्णालयाचा रूग्णसेवेचा आदर्श वस्तूपाठ

सरकारी रुग्णालय म्हटले की,भोंगळ कारभार अन सुश्रुषेतील आबाळ …अशीच काहीशी धारणा सर्वाची बनलेली असते. मात्र,ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाने याला छेद दिला असुन कोविड उपचारांमध्ये उत्तम सुश्रूषा करून रुग्णसेवेचा वस्तुपाठ घालुन दिला आहे.कोरोनाबाधित झालेल्या पुण्याच्या ससुन रुग्णालयाचे ६७ वर्षीय निवृत्त अधिक्षक डॉ.के.पी.उबाळे यांच्यावर यशस्वी उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले. सिव्हीलच्या या उपचार पद्धतीची डॉ.उबाळे यांच्या कन्या डॉ. तेजस्विनी उबाळे – पवार व कुटुंबियांनी प्रशंसा केली असुन तेथील डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे मनस्वी आभार मानले आहेत.
ठाण्यातील कळवा,पारसीकनगर येथे राहणारे सुवर्णपदक विजेते एमडी डॉ.उबाळे पुण्याच्या ससुन रुग्णालयाचे निवृत्त अधिक्षक असुन पूर्वी ते ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात क्लासवन अधिकारी होते.गेली चार वर्षे ते मधुमेह आणि स्मृतीभंश सदृष्य आजाराशी लढत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सहा महिने डॉ.उबाळे घरातच विश्रांती घेत असतानाच क्षुल्लक ताप आला. त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्याने कुटुंबिय हादरून गेले.अनेक नामांकित खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी विचारविमर्श करूनही कुठे अॅडमिट करावे ? या विवंचनेत असतानाच ठाण्याचे सिव्हील रुग्णालय कोविड रुग्णालय असल्याची माहिती मिळाली.शिवाय,डॉ.उबाळे यांची कारकिर्द सिव्हीलमध्येच पार पडल्याने तेथील रेडीओलॉजिस्ट डॉ. तेजस्विनी भगत यांना संपर्क साधला.त्यांनी तात्काळ सरांना रुग्णालयात दाखल करा.असे सांगितल्याने सिव्हीलमध्ये अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.डॉ.उबाळे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला.त्यानंतरही,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सृजीत शिंदे व डॉ.नेताजी मुळीक ही द्वयी अहोरात्र झटत होती.पुर्णपणे परस्वाधिन असल्याने डॉ. उबाळे यांच्या देखभालीसाठी कुटुंबियांनी खाजगी ब्युरोमधील दोन वॉर्डबॉय नेमले होते.एक क्षण असाही आला…कोविड उपचारांना प्रतिसाद देईनासे झाल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर- कर्मचाऱ्यांसोबत कुटुंबियसुदधा चिंतेत पडले.पण,डॉ.शिंदे व डॉ.मुळीक यांनी सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा सुरूच ठेवल्याने डॉं.उबाळेनी अखेर,कोरोनावर मात करीत ते सुखरूप घरी परतले.यापुर्वी त्यांनी केलेल्या निःस्वार्थ रुग्णसेवेचा परतावाच जणु त्यांना मिळाला होता.हे केवळ सिव्हील रुग्णालय प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांचे फळ असुन,आम्ही सदैव त्यांचे ऋणी आहोत.अशा भावना त्यांच्या कन्या डॉ. तेजस्विनी पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान,कोरोना महामारीत डॉक्टर व परिचारिकांच्या अविरत सुश्रुषेमुळे किंबहुना रुग्णालयातील योग्य उपचारपद्धतीमुळे सेलिब्रेटीपासून ते सरकारी अधिकारीदेखील सिव्हील रुग्णालयाला प्राधान्य देत असल्याचे डॉ. मुळीक म्हणाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading